Advertisement

चेंबूरच्या वसतीगृहात प्रजासत्ताक दिन साजरा


चेंबूरच्या वसतीगृहात प्रजासत्ताक दिन साजरा
SHARES

चेंबूर - प्रजासत्ताक दिनानिमित्त चेंबूरच्या संत एकनाथ आणि आदित्य बिर्ला सेंटर या दोन्ही वसतीगृहात ध्वजारोहण करण्यात आले. चेंबूरच्या आरसी मार्ग इथल्या संत एकनाथ सरकारी वसतीगृहात 80 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. जी. एन. गायकवाड मार्ग इथल्या आदित्य बिर्ला सेंटर या अनाथ, निराधार मुलांच्या वसतीगृहात झालेल्या ध्वजारोहणाच्या दरम्यान 130 विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, वसतीगृहाचे माजी विद्यार्थी असलेल्या रामचंद्र वाणी यांच्यासह युवा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी इथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनाथ असूनही भविष्यात आपण कसे पुढे जाऊ शकतो या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा