कर्जामुळे शेतकऱ्यांना लागला 25 करोड रुपयांचा चुना

बोरीवली - येथील पश्चिमेकडील साई कॉम्प्लेक्समधील युनिक ग्रुप ऑफ कंपनीने 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या नावावर फसवणूक केली आहे. या कंपनीने शेतकऱ्यांचे 25 करोडपेक्षा अधिक रुपये बुडवले. कुक्कुटपालन, फळांचं पीक आणि अशा अनेक गोष्टींसाठी कर्ज देण्याच्या नावावर हे कर्ज बुडवण्यात आलं आहे. नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत. हे सर्व शेतकरी बोरीवलीच्या पोलीस स्टेशनबाहेर एकत्र जमा झाले आणि पोलिसांसमोर न्यायाची मागणी करु लागले. बोरीवली पोलिसांनी या प्रकरणी तपास करायला सुरुवात केली आहे.

Loading Comments