Advertisement

मुंबईच्या सर्प मैत्रिणीची कहाणी..


SHARES

मुंबई - आपण कायम प्राणी मित्र हा शब्द ऐकत आलो. मात्र प्राणी मैत्रिण कधी ऐकलंय का हो? प्राणी मैत्रीणी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच सापडतील. त्यातलीच एक आहे मुंबईमध्ये राहणारी निशा सुब्रह्मण्यम. निशा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून साप पकडण्याचे आणि त्यांना त्यांच्या स्वगृही धाडण्याचे काम करते.

निशाचा भाऊ सुनीश हा सर्प मित्र असून, निशाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. लहानपणापासूनच भावाचं काम पाहून निशाही सर्प मैत्रीण झाली आहे. शहरी भागात साप आढळल्यास अनेक लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र निशा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. विशेष म्हणजे फक्त सापच नाही तर निशा इतर जखमी झालेल्या प्राण्यांनाही वाचवून त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडते. सध्या निशा ही मेनका गांधी यांच्या पीपल्स फॉर अॅनिमल या संस्थेमध्ये काम करत असून, ती प्लांट अँड अॅनिमल या संस्थेची सदस्य देखील आहे. 

2005 साली निशाचा या कामाबद्दल गुणगौरव करत तिची अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने ऑफिसर म्हणून निवड केली. तर 2014 मध्ये तिची जंगल प्राणी गुन्हेगारी नियंत्रण स्वयंसेविका म्हणून निवड करण्यात आली. पुढे 2016 मध्ये भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 100 महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात निशाचा देखील समावेश होता. निशाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा