निर्माल्यातून फुलणार उद्यान !

  Pali Hill
  निर्माल्यातून फुलणार उद्यान !
  मुंबई  -  

  मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा, फुलांच्या निर्माल्याचा सदुपयोग व्हावा याकरिता महापालिकेने २१ ठिकाणी निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू केले आहेत. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुदर्शी पर्यंतच्या ११ दिवसांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात १ हजार ८३ मेट्रीक टन एवढे निर्माल्य जमा करण्यात आले आहे. या जमा झालेल्या निर्माल्यापासून महापालिका सेंद्रीय खत आणि गांडूळ खत तयार करणार आहे. याचा वापर महापालिकेच्याच उद्यानांमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी साधारणपणे ९ तासांच्या कालावधीत मुंबईतील सर्व गणेशमूर्ती विसर्जन स्थळे आणि संबंधित रस्ते यांची साफसफाई महापालिकेद्वारे करण्यात आली, असेही बालमवार यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.