संपामुळे वर्दळ मंदावली

 Churchgate
संपामुळे वर्दळ मंदावली
संपामुळे वर्दळ मंदावली
संपामुळे वर्दळ मंदावली
See all
Churchgate, Mumbai  -  

सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी आज पुकारलेल्या संपाचा प्रभाव दिसत असून, बहुतांश शासकीय कार्यालये असलेल्या फ्री प्रेस जर्नल मार्गावरील वर्दळ मंदावली आहे.  या एकदिवसीय संपाचा फटका टॅक्सी चालकांनादेखील बसलाय. आज सकाळी चर्चगेट स्टेशनबाहेरील शेअरींग टॅक्सी स्टॅंडवर नेहमीसारखी गर्दी नव्हती. तसेच सकाळी खादयविक्रेत्यांच्या स्टॉलवर असणारी गर्दी देखील ओसरल्याचे पाहायला मिळत होते.सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी आज पुकारलेल्या एकदिवसीय संपाचा फटका टॅक्सी चालकांनादेखील बसलाय. या संपाचे पडसाद मुंबईतील शासकीय कार्यालयांमध्येही दिसून येताहेत. फ्री प्रेस जर्नल मार्गावरील मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यानं या मार्गावरी वर्दळ दिसून येत नाहीये. संपामुळे मनोरा आमदार निवासात कर्मचारी नसल्यामुळे अभ्यागंतांच्या नोंदणीचे काम सुरक्षारक्षकच करत होते. 

 

Loading Comments