Advertisement

स्टेजवर अवतरले विठ्ठल, बाहुबली, कृष्ण...


स्टेजवर अवतरले विठ्ठल, बाहुबली, कृष्ण...
SHARES

वरळी : यंदा 'सहजीवन रहिवासी गणेशउत्सव हे वरळीतील प्रसिद्ध मंडळ. यावर्षी  मंडळाचे हे २९वे वर्ष आहे.  नेहमी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यावेळी मंडळाच्यावतीने लहान मुलांसाठी पीठ पैसा, वकृत्व, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  पण मंडळाने आयोजित केलीली 'वेशभूषा स्पर्धा' चांगलीच रंगात आली. लहान मुलांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. अगदी ५ वर्षाच्या चिमुकल्यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी  विठ्ठल, बाहुबली, कृष्णाची वेशभूषा करत चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात स्फर्धेत भाग घेतला. लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे उपक्रम राबवण्यात आल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.  

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा