अंधेरी रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा

 Andheri
अंधेरी रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा
अंधेरी रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा
See all

अंधेरी - अंधेरी रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फेरीवाले, विक्रेते यांची अडथळ्यांची शर्यत पार करून स्थानक गाठावे लागत आहे.

अंधेरी पूर्व स्थानकाबाहेरील वडापाव दुकानासमोर हातगाड्यांवरून विक्री करणारे व फेरीवाल्यांनी बस्तानच बसवले आहे. या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते, अशा गर्दीत हे फेरीवाले बेकायदेशीर धंदे मांडून बसल्यामुळे प्रवाश्यांना व़ वहानांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Loading Comments