प्राईड सोसायटीचा मदतीचा हात

  Worli
  प्राईड सोसायटीचा मदतीचा हात
  मुंबई  -  

  वरळी - प्राईड ऑफ इंडिया वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आर्थिक मदतीच्या उद्देशाने 120 गरीब आणि गरजू नागरिकांना प्रमुख अतिथी सहाय्यक चॅरिटी आयुक्त आर. एन. इंगोले यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. सोमवारी वरळीच्या सनव्हिला हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे धनादेश देण्यात आले. यावेळी कॅनरा बँक वरिष्ठ व्यवस्थापक मंडलिक तिवारी, सोसायटीचे अध्यक्ष राधाकृष्ण ठोंबरे, सेक्रेटरी रफिक शेख, किरण पाटील, रमेश बाणे उपस्थित होते.

  आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवता याव्यात या उद्देशाने प्रथमच प्राईड ऑफ इंडिया वेल्फेअर सोसायटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात विधवा, अनाथ, जेष्ठ नागरिक, गरीब आणि गरजू ज्यांना शिक्षणासाठी मदत होईल अशा 120 नागरिकांना धनादेश वाटप करण्यात आले असून, त्यांचे पालन पोषण करणारे किंवा ज्या व्यक्तीची जबादारी कोणीही घेऊ शकत नाही अशा नागरिकांना सोसायटीच्या वतीने दरमहा पैसे पुरविण्यात येणार असल्याची ग्वाही सोसायटीच्या पदाधिकऱ्यांनी दिली.

  विशेष म्हणजे सोसायटीकडे येणार निधी हा शहरातील अथवा ज्यांना दानधर्म करण्याची आवड अशा नागरिकांकडून जमा होतो. त्याचा वापर योग्य ठिकाणी व्हावा यासाठी सोसायटीच्या वतीने गरजू नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत असल्याचे अध्यक्ष राधाकृष्ण ठोंबरे यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

   © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.