चेंबूरमध्ये अनधिकृत पार्किंगला ऊत

Chembur
चेंबूरमध्ये अनधिकृत पार्किंगला ऊत
चेंबूरमध्ये अनधिकृत पार्किंगला ऊत
See all
मुंबई  -  

चेंबूर - चेंबूरमधील आरसी मार्गावर अनधिकृत पार्किंगला ऊत आला असून, येथे काही हॉटेल चालकांकडून नियम धाब्यावर बसवून पार्किंग केले जात आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

चेंबूर परिसरातील आरसी मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यातच येथील सिंगसाहब, मॅकेडो, स्टेटस, रसना पंजाब आणि स्टार परेड या हॉटेलचे मालक
रात्रीच्या वेळेस सर्व नियम धाब्यावर बसवत या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करत आहेत. या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसह या ठिकाणी अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांनी तत्काळ ही अनधिकृत पार्किंग येथून हटवावी, अशी मागणी काही वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.