मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गणपत पाटीलनगरचा मुद्दा

  मुंबई  -  

  दहिसर - दहिसर पूर्वेकडील काशीमठ मंदिर इथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आमदार मनीषा चौधरी यांनी गणपत पाटीलनगरचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर या मुद्द्याची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.

  दहिसर पश्चिम परिसरात गणपत पाटील झोपडपट्टी आहे. या भागात हजारो नागरिक राहतात. रेशन कार्ड, आधारकार्ड, मतदार अोळखपत्र असूनही येथील लोक पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. अखेर हा मुद्दा मनीषा चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्यावेळी वेळ पडली तर कोर्टात जाऊ, पण हा मुद्दा सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.