कुर्ल्यात जनरेटर व्हॅनची अनधिकृत पार्किंग 

 Kurla
कुर्ल्यात जनरेटर व्हॅनची अनधिकृत पार्किंग 

सायन-पनवेल रोडवरून कुर्लाच्या कसाईवाडा परिसरात जाणाऱ्या रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून जनरेटर व्हॅनची अनधिकृत पार्किंग सुरू आहे.  त्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील रहिवाशांनादेखील  याचा फटका बसत आहे. तसेच याठिकाणी झोपडपट्टी आणि महाविद्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते.  अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला या जनरेटर व्हॅनची अवैधरित्या पार्किंग होत असून वाहतूक कोंडी झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

 

Loading Comments