Advertisement

श्री जाखादेवी मंदिरात अवतरले देव


श्री जाखादेवी मंदिरात अवतरले देव
SHARES

दादर - दादर मधील जाखादेवी मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा गंगापूजनाचा देखावा साकारण्यात आला आहे. या मंडळाची 11 फूटांची भव्य मूर्ती पेण हम्रापूर चे मूर्तीकार रविंद्र रसाळ यांनी बनवलीय. मंडळाची स्थापना 1947 साली करण्यात आली असून यंदा मंडळाचे 70 वे वर्ष आहे. विभागातील सर्वात जुना बाप्पा असल्यामुळे याला चळवळींचा वेगळा इतिहास आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या शिबीरांचे आयोजन करण्यात येते. तसंच मंडळाकडून 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीही देण्यात येते. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा