जोगेश्वरीत साकारले सेनाभवन

 Sham Nagar
जोगेश्वरीत साकारले सेनाभवन
जोगेश्वरीत साकारले सेनाभवन
जोगेश्वरीत साकारले सेनाभवन
See all
Sham Nagar, Mumbai  -  

जोगेश्वरी-  जोगेश्वरीतल्या युवक एकता मंडळच्या क्रांतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 27 वं वर्ष आहे. यावेळी या मंडळाने सेनाभवन साकारलंय.हे सेनाभवन पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. मंडपात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सेना स्थापनेपासून आतापर्यंतची मागील ५० वर्षांच्या इतिहासाचं दर्शन गणेश भक्तासमोर चित्राद्वारे मांडण्यात आलंय. गणेशदर्शनासाठी मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड, शिवसेना नेते रामदास कदम,खासदार श्री. गजानन किर्तीकर ,विभागप्रमुख अॅड.अनिल परब,मा. महापौर तसंच आमदार श्री. सुनील प्रभू आदी मान्यवर हजेरी लावली. या उत्सवात आयोजक तसंच नगरसेवक श्री.राजू पेडणेकर,अध्यक्ष अशोक खाडे,शाखाप्रमुख गोविंद वाघमारे,दत्ता गुरले, ज्ञानेश्वर जाधव आणि मंडळाचे १५० कार्यकर्ते सहभागी होऊन मेहनत करतात. ​

Loading Comments