कामगार आघाडीचा बाप्पा

  Dadar
  कामगार आघाडीचा बाप्पा
  मुंबई  -  

  दादर- 1986 साली स्थापना झालेल्या कामगार आघाडी गणेशोत्सव मंडळाचे यंदा 31 वे वर्ष आहे.  या मंडळाच्या बाप्पांची 10 फूटांची भव्य मूर्ती लालबागचे मुर्तीकार नारायण म्हसूरकर हे घडवतात. 11 दिवसांच्या या बाप्पाच्या कौतुक सोहळ्यात महिला हिरहिरीने सहभागी होतात. मिल कामगारांच्या पत्नी आणि विभागातील इतर महिला मंगळागौर उत्साहाने साजरी करतात. सत्यनारायण पूजा, भजन असे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. आजूबाजूच्या गोंधळामुळे, आवाजामुळे लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजित करता येत नाहीत अशी खंत मंडळातील सदस्य व्यक्त करतात. मंडळाच्या पैशातून गिरणी कामगारांना मदत केली जाते. गतवर्षी या ठिकाणी राजकिय देखावा साकारला होता. यंदा मंडळाने पाण्याच्या कारंजांचा देखावा साकारला आहे. त्याचबरोबर गतवर्षी मंडळाने दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. गिरणी कामगारांच्या वर्गणीतून मिळणा-या पैशातून भावी काळात सेवाभावी संस्थांना मदत करण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती मंडळाचे सेक्रेटरी जयवंत गणपती गावडे यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.