इको फ्रेंडली नॅनो गणेशा

 Eco
इको फ्रेंडली नॅनो गणेशा
इको फ्रेंडली नॅनो गणेशा
इको फ्रेंडली नॅनो गणेशा
इको फ्रेंडली नॅनो गणेशा
इको फ्रेंडली नॅनो गणेशा
See all

माहिमच्या मच्छिमार वसाहतीमधील विंदे मूर्तीशाळेत 6 इंचापासून 3 फुटांपर्यंतचे इको फ्रेंडली बाप्पा सध्या घरोघरी विराजमान होण्याच्या तयारीत आहेत. माहिमच्या केतन विंदे या मूर्तिकाराने दरवर्षी 14-15 प्रकारच्या डिझाईनचे गणपती बनवून इको फ्रेंडली गणपतींचा ट्रेंड यंदाही पुढे नेला आहे. जिवंत डोळ्यांच्या मूर्ती ही ओळख असलेल्या या मूर्तींसाठी लागणारी माती गुजरातच्या भावनगरमधून आणली जाते. 2500 ते 25 हजारांपर्यंत किंमतीचे हे गणेश सध्या गणेशभक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

केतन विंदे यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून मूर्ती घडवण्यास सुरुवात केली आणि गुरु रविकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षे काम केल्यावर स्वतःची कार्य़शाळा सुरु केली. आज 10 वर्षांचा इतिहास असलेली ही कार्यशाळा निसर्गप्रेमी गणेशोत्सवाचे एक द्योतक बनली आहे.

 

Loading Comments