दहिसरच्या शौचालयाची दुरवस्था

दहिसर : दहिसरच्या पूर्वेकडील केतकीपाडामधील गुनगवा कंपाऊंडमधील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शौचालयाचे दरवाजेही तुटलेल्या अवस्थेत आहेत.तसंच गेल्या काही वर्षांपासून या शौचालयाची सफाईही झाली नसल्याचं चित्र आहे. नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विभागातील हा परिसर आहे.मात्र या परिस्थितीकडे स्थानिक पदाधिकारी लक्ष देत नसल्याचं दिसून येतंय. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता ही या शौचालयाची काय अवस्था झालीय. वारंवार याप्रकरणी तक्रार करुनही स्थानिक पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय.

Loading Comments