'खटयाळ घुंगरू' लावणीने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने

 Parel
'खटयाळ घुंगरू' लावणीने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने

परळ - 'श्री महाकाली चित्र मुंबई'चा आठवा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी दामोदर नाट्यगृहात साजरा करण्यात आला. या वेळी 'खटयाळ घुंगरू' लावणी सादर करण्यात आली. या सोहळ्यात पारंपरिक लावण्यांचा अस्सल बाज आणि कलाविष्कार पाहण्याची संधी रसिक श्रोत्यांना मिळाली.

लावणी सादर करण्यासाठी उत्कृष्ट लावणी कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच या नाट्य कलाकारांचा सन्मानही करण्यात आला. 

'श्री महाकाली चित्र मुंबई'ने आठव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 1 हजार 25वा प्रयोग सादर केला.

Loading Comments