महिलांकरता स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर

 Malad West
महिलांकरता स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर
महिलांकरता स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर
See all

पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन तर्फे मसुराश्रम पांडुरंग वाड़ी गोरेगाव पूर्व येथे महिलांकरता स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर राबवण्यात आलं. शिबिरामध्ये गणरायाचा सजावटीचे साहित्य  बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये निर्मल यलवत्ती यांनी सहभागी महिलांना प्रशिक्षण दिले. कागदापासून रंगीबेरंगी फुले, आरास, तोरण आदी सजावटीचे साहित्य महिलांनी बनविले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा नयना कनल, सचिव भूषण राजाध्यक्ष, सल्लागार नितिन दळवी, मनसेच्या गोरेगाव विधानसभेच्या विभाग अध्यक्षा सुनीता चुरी ,गड क्र.४६ च्या महिला शाखा अध्यक्षा सुरेखा केवट तसेच फाउंडेशनचे अमन यादव आणि इतर सदस्य उपस्थित होते.

 

Loading Comments