लालबाग - बाप्पावर शिवलिंगातून पुष्पवृष्टी

Mumbai  -  

लालबाग - लालबागधील अनोखी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी गणेश भक्तांची रीघ लागते. 'श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळा'नं लालबाग परिसरातून निघणाऱ्या सर्व गणपतींसाठी शिवलिंगातून पुष्पवृष्टी केली. मंडळाने साकारलेले शिवलिंग हातात त्रिशूल, नाग, डोक्यावर गंगा, डमरू, चंद्रकोर अशी शंकर देवाची प्रतिकृती आहे.  बेलपत्र, भस्म, रुद्राक्ष यांनी परिपूर्ण असलेल्या शिवलिंगातून या मंडळानं पुष्पवृष्टी केली. दरवर्षी या मंडळाच्या वतीनं करण्यात येणारी पुष्पवृष्टी भक्तांसाठी आकर्षण ठरते.

Loading Comments