लोअर परळचा राजा म्हणून प्रसिद्द असलेले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८३वे वर्षे साजरे करीत आहे. येथील गणेशोत्सवात अजूनही गिरण्या सुरू असतानाच्या काळातील थाट दिसून येतो. काळाच्या ओघात प्रथा, परंपरांचे स्वरूप बदलले असले तरी या मंडळानं जुन्या परंपरा जपल्या आहेत. तसंच या मंडळाकडून व्यसनमुक्ती, समाज प्रबोधन, लोककला आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत असे विविध कार्यक्रम राबवले जातात. तसंच महिलांसाठी मंगळागौर, स्त्री सुरक्षित प्रबोधन असे खास कार्यक्रम मंडळाकडून आयोजित केले जातात.