फेरीबोट बंद पडल्याने दळणवळण ठप्प

 Madh Island
फेरीबोट बंद पडल्याने दळणवळण ठप्प
फेरीबोट बंद पडल्याने दळणवळण ठप्प
फेरीबोट बंद पडल्याने दळणवळण ठप्प
See all

मढ - मढ ते वर्सोवा जोडणारा दळणवळणाचा एकमेव मार्ग म्हणजे फेरीबोट. मात्र आज सकाळी फेरीबोटच काही वेळ बंद पडल्या. विसर्जनाचा कचरा बोटीत अडकल्याने बोट बंद पडली होती. त्यामुळे या मार्गावरील दळणवळणच काही काळ ठप्प झालं. त्याचा थेट फटका या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना बसला. बोट बंद पडल्यामुळे जवळपास एक किलोमीटरपर्यंत मढच्या नागेश्वर मंदिरापर्यंत प्रवाशांची रांग लागली होती. अखेर काही तासानंतर बोट दुरुस्त करण्यात आली. वर्सोवा समुद्रकिनारी गुरुवारी गणरायाचे विर्सजन झाले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठया प्रमाणात कचरा साठला होता. तो कचरा बोटीत अडकल्यामुळे फेरीबोट काही काळ बंद पडल्याचे स्थानिक नागरिक विक्रम कपूर यांनी सांगितले.

Loading Comments