दादरमध्ये भरली महाराष्ट्र व्यापारी पेठ

  Dadar
  दादरमध्ये भरली महाराष्ट्र व्यापारी पेठ
  मुंबई  -  

  दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने व्यापार पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गृहोपयोगी वस्तूंसह फॅशनेबल कपडे आणि आधुनिक ज्वेलरीही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. याठीकाणी 105 वेगवेगळ्या प्रकारचे वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. व्यापारीपेठेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त मराठी व्यापा-यांना स्टॉल देण्यात आले आहेत. उद्योग जगतात तरुण आणि महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी 1989 पासून उद्योजक मंडळातर्फे व्यापार पेठ भरवले जाते. दादरच्या डॉ. डिसिल्व्हा शाळेच्या पटांगणात हे व्यापारपेठ ग्राहकांसाठी खुली करण्यात आली आहे. यंदा 26 ऑगस्ट पासून 2 नोव्हेंबरपर्यंत ठिकाणी वस्तूंची  विक्री सुरू राहणार आहे. 

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.