गोरेगावच्या शाळेत मराठी दिवस उत्साहात साजरा

  Goregaon West
  गोरेगावच्या शाळेत मराठी दिवस उत्साहात साजरा
  मुंबई  -  

  गोरेगाव - राज्यभरात 27 फेब्रुवारी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याप्रमाणे गोरेगाव (प.) इथल्या अ. भि. गोरेगावकर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या ऊत्साहाने मराठी दिन साजरा केला. या शाळेतल्या 5वी ते 7वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सकाळी 7 ते 10 या वेळेत भारुड, भजन, भक्तीसंगीत आणि स्त्री भ्रूण हत्या, स्त्री समानता यावर नाटकं सादर केली. त्याचबरोबर दुपारी 1 ते 4 या वेळेत इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी अभिवाचन, कवीसंमेलन, लोकनृत्य, पथनाट्य सादर केले. मराठी शाळेत मराठी भाषेला प्राधान्य दिलं जावं असं मत या शाळेचे प्राध्यापक पी. मोरे यांनी व्यक्त केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.