हिरानंदानी टॉवरमध्ये आगीचा भडका

    मुंबई  -  

    कांदिवली- ग्राऊंड फ्लोअरवर रहिवाश्यांची धावपळ...32व्या मजल्यावर आगीचा उडालेला भडका...आणि वरून कोसळणारा पाऊस...हे दृष्य होतं कांदीवलीच्या हिरानंदानी टॉवरचं..आणि वेळ होती दुपारी पावणे एकची...नेहमीप्रमाणे हिरानंदानीच्या रहिवाश्यांची दुपारच्या कामाची लगबग सुरु असताना अचानक आरडाओरडा सुरु झाला आणि सर्व रहिवासी घरातून खाली उतरले...इमारतीच्या शेवटच्या म्हणजेच 32व्या मजल्यावर आगीचा भडका उडाल्याच लक्षात झालं आणि एकच धावपळ सुरु झाली..सुरुवातीला एकाच फ्लॅटवर लागलेल्या आगीने हळूहळू आसपासचे फ्लॅट्सही कवेत घेतले...सुदैवानं या फ्लॅट्समध्ये कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला...

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.