आनंदनगर परिसरात डासांची दहशत

Dahisar, Mumbai  -  

दहिसर - दहिसरच्या आनंद नगर भागात संध्याकाळ होताच रस्ते सुनसान व्हायला सुरुवात होते. नागरिक संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडताना कमालीचे तणावग्रस्त आहेत. आणि याला कारण आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेला मच्छरांचा फैलाव. याच परिसरात घाण पाण्याचा नाला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मच्छरांचा फैलाव झालाय. या परिसरात अनेकजण आजारीही पडले आहेत. या प्रकाराची तक्रार पालिकेकडे वारंवार करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. त्यामुळे डेंग्यु, मलेरिया अशा रोगांच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पालिका आनंदनगरच्या रहिवाश्यांची दखल घेणार की नाही असाच प्रश्न स्थानिकांना पडलाय. 

Loading Comments