आई आणि मुलगी शिकतात एकाच वर्गात!

मुलुंड - माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो असं म्हणतात. जर तुमची शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण करू शकता. आणि याचा आदर्श घालून दिलाय मुलुंडच्या नानेपाडा इथे राहणाऱ्या सीमा वैती यांनी. वय़ाच्या 42 व्या वर्षी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचा जणू त्यांनी विडाच उचललाय. योगायोग म्हणजे सीमा आणि त्यांची मुलगी एकाच वर्षात शिकतायेत.

Loading Comments