दुचाकी अपघातात दोन भावांचा मृत्यू

Kurla
दुचाकी अपघातात दोन भावांचा मृत्यू
दुचाकी अपघातात दोन भावांचा मृत्यू
See all
मुंबई  -  

बकरी ईद निमित्त देवनार पशुवधगृह येथे बकरे खरेदीसाठी गेलेल्या दोन भावंडाचा दुचाकी अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. अपघातात आई किरकोळ जखमी झालीय..शनिवारी मध्यरात्री ही घटना घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये घडली. विक्रोळी पार्क साईट येथे राहणारे  शाहनवाज शेख (१९) आणि यसार शेख (१३) हे शनिवारी रात्री त्यांच्या आईसह देवनारकडे दुचाकी वरुन ट्रिपल सीट जात असताना हा अपघात घडला. शाहनवाज गाडी चालवत असताना त्याचे गाडीवरील नियत्रंण सुटल्याने गाडी पुढे असलेल्या डंपरला धडकली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.