उत्सवांमुळे चोख सुरक्षा व्यवस्था

 Bandra west
उत्सवांमुळे चोख सुरक्षा व्यवस्था
Bandra west, Mumbai  -  

गणेशोत्सव, बकरी ईद आणि माउंट मेरीची जत्रा असे सण एकापाठोपाठ येत असल्याने मुंबई पोलिसांकडून वांद्रे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. 5 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे, तर 12 सप्टेंबरला बकरी ईद साजरी होणार आहे. दरम्यान 11 सप्टेंबरला सुरू  माउंट मेरीच्या जत्रेलाही प्रारंभ होत आहे. या काळात समाजकंटकांकडून सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. 

Loading Comments