Advertisement

विद्यापीठात रंगणार 'मेत्ता'


विद्यापीठात रंगणार 'मेत्ता'
SHARES

कलिना - मुंबई विद्यापीठाचा 'मेत्ता' आंतरराष्ट्रीय महोत्सव येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. विद्यापीठस्तरावर आयोजित केला जाणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे. या महोत्सवातून विविध देशांच्या संस्कृती आणि कलांचे सादरीकरण केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, परिवर्तन फाऊंडेशन आणि व्हॉइस विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, न्याय, बंधुता या शिकवणीवर आधारित हा महोत्सव आहे. 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील कवीवर्य कुसुमाग्रज सभागृहात हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात श्रीलंका, आर्मेनिया, मोझांबिक, रवांडा, आफ्रिका देशांचा समावेश असणार आहे. आठवडाभर चालणार्‍या या महोत्सवात नाटक, चर्चासत्रांचा समावेश असणार आहे. या महोत्सवासाठी ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, लेखक संजय पवार उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवासाठीचे पासेस मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी थिएटर आर्ट विभागात 15 सप्टेंबरपासून उपलब्ध करण्यात येतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement