Advertisement

मुंबईत 15 जानेवारीला मॅरेथॉन


मुंबईत 15 जानेवारीला मॅरेथॉन
SHARES

मुंबई - स्टॅंडर्ड चार्टर्ड या संस्थेने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा 15 जानेवारीला मुंबईत होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हजेरी लावणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू अयेले अबशेरो आणि दिंकेश मेकाश, ऑलंपिक खेळाडू खेता राम, एम. डी. युनुस आणि इलाम सिंग भाग घेणार आहेत. तसंच राष्ट्रीय धावपट्टू खेळाडू ज्योती गावटे, मोनिका राउत, मोनिका आथरे हे खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

मॅरेथॉनमध्ये आतापर्यंत 6, 342 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. तसेच हाफ मॅरेथॉनसाठी 14, 663 आणि ड्रिम मॅरेथॉनमध्ये 19, 980 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. जवळपास 43, 379 लोक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलाय. स्टॅंडर्ड चार्टर्ड संस्थेचे अध्यक्ष विवेक सिंगही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी मध्य रेल्वेतील करीरोड स्टेशनपासून आणि पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल स्टेशनपासून पहाटे 3 ते 5 मोफत बससेवा असणार आहे.

   प्रकारकिलोमीटर     मॅरेथॉनची सुरुवात         मॅरेथॉनचा शेवट
फुल मॅरेथॉन42.195सकाळी 5.40 (सीएसटी)दुपारी 12.10 (सीएसटी)
हाफ मॅरेथॉन21. 097सकाळी 5.40 ( वरळी सीफेस)सकाळी 9.10 (सीएसटी)
ड्रिम रन6सकाळी 9 ( सीएसटी )सकाळी 10.30 (मेट्रो बिग सिनेमा)
सिनियर सिटीझन4.3सकाळी 8 ( सीएसटी )सकाळी 10 ( मेट्रो बिग सिनेमा )
चॅम्पियनशिप
( दिव्यांग )
1.75सकाळी 7.35 ( सीएसटी )   सकाळी 8.35 ( सीएसटी )
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा