वाहतूक पोलीस हवालदार पुन्हा निशाण्यावर

  Kurla
  वाहतूक पोलीस हवालदार पुन्हा निशाण्यावर
  मुंबई  -  

  वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या निधनानंतर चोवीस तास उलटले नाहीत 

  तोपर्यंत आणखी एक घटना समोर आली आहे. नाकाबंदीची कारवाई सुरू असतानाही बाईकस्वाराने वाहतूक पोलीस हवालदाराला धक्का देत तेथून पळ काढला. कुर्ल्यातल्या विनोभा भावे बैलबाजार पोलीसस्थानक परिसरात दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ट्रॅफिक हवालदार देविदास निंबाळकर  जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांचा धाकच उरला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे  

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.