प्रसुतीगृहाची प्रतीक्षा अखेर संपली

 Goregaon
प्रसुतीगृहाची प्रतीक्षा अखेर संपली
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम परिसरात राहणा-या नागरिकांची प्रसुतीगृहाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. येथील हॉस्पिटलच्या जागेचे पालिकेने बुधवारी भूमीपूजन केले. त्यामुळे येथील रहिवाशांना आता दिलासा मिळाला आहे.

या परिसरात असलेले टोपीवालावाडी प्रसुतीगृह गेल्या 5 वर्षांपासून बंद आहे. .येथील प्रसुतीगृहाची इमारत जीर्ण झाल्यामुळे सदर प्रसुतीगृह सिद्धार्थ हॉस्पिटलला हलवण्यात आले. त्यामुळे गर्भवतींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,

मात्र गोरेगाव येथे प्रसुतीगृहाची सुसज्ज व नवीन इमारत महापालिका बांधणार आहे. या हॉस्पिटलचे काम लवकर पूर्ण झाल्यास येथील लोकांची गैरसोय दूर होणार आहे. आज झालेल्या या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील प्रभू प्रभाग समिती अध्यक्षा लोचना चव्हाण, नगरसेवक राजू पाध्ये उपस्थित होते.

Loading Comments