स्मशानभूमीच्या वाटेवर चिखल

 Oshiwara
स्मशानभूमीच्या वाटेवर चिखल
स्मशानभूमीच्या वाटेवर चिखल
See all

गोरेगाव - ओशिवरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने आपल्या आप्तेष्टांना शेवटाचा निरोप देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गोरेगाव पश्चिमेकडील एस. व्ही. रोड शेजारी ओशिवरा हिंदू स्मशानभूमी आहे. या

स्मशानभूमीपासून आत जाण्याचा रस्त्यावर खड्डे पडले असून, त्यात सांडपाणी साचून चिखल झाला आहे. तसेच रत्त्यावरील अतिक्रमण, रस्त्यावर उभे असलेले टेम्पो, ट्रक यामुळे नागरिकांची दमछाक होत आहे.

मात्र या समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गधी पसरत आहे. याबाबत महानगर पालिकेला वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Loading Comments