तरुणाच्य़ा आत्महत्येमुळे मेट्रोचा खोळंबा

 Ghatkopar
तरुणाच्य़ा आत्महत्येमुळे मेट्रोचा खोळंबा
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - साकीनाका मेट्रो स्थानकावर एका तरुणाने मेट्रो ट्रेनखाली आत्महत्या केल्याने आज सकाळी मेट्रो सेवा विस्कळीत झाली. तासभराच्या खोळंब्यामुळे मेट्रो स्टेशनांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती. अखेर दीड तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली.

आज सकाळी 9.20 च्या सुमारास उदय मिश्रा (25) या तरुणाने साकीनाका मेट्रो स्थानकावर वर्सोवा-घाटकोपर मेट्रोखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली. त्यानंतर घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रो मरोळ नाका स्टेशनपर्यंतच चालवल्या जात होत्या. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नसली, तरी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा मात्र यामुळे खोळंबा झाला.

Loading Comments