चुनाभट्टी परिसरातील शिवनेरी मित्र मंडळ गणेश मंदिराच्या बाजूला सध्या मोठ्या प्रमाणात कच-याचे ढिग जमा होत आहेत. पालिका वेळेवर कचरा उचलत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. त्यामुळे परिसरात दु्र्गंधीसह साथीचे आजार पसरले आहेत. रहिवाशांनी याबाबत पालिकेमध्ये तक्रारही दिलीय. मात्र पालिकेकडून काहीही तोडगा काढला जात नसल्याचा आरोपही करण्यात आलाय. परिणामी परिसरात दुर्घंधी पसरत असल्याने याचा त्रास सर्वच रहिवाशांना सहन करावा लागत आहे.