दहिसर हायवेवर अवैध पार्किंग

Dahisar, Mumbai  -  

दहिसर हायवे परिसरात अवैधरित्या पार्किंग केली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा ही पार्किंग केली जाते. त्यामुळे इथून प्रवास करणा-या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वारंवार तक्रार करुनही पोलीस या अवैध पार्किंगवर कारवाई करु शकलेली नाही. रेती भरुन असलेले हे ट्रक अवैधरित्या इथे पार्किंग केले जातात. त्यामुळे रस्त्यावर रेती पडलेली असते. या रेतीवरुन पडून दुचाकीचालकांचा अपघात होण्याच्या घटनाही घडल्यात. पोलीस मात्र या सर्व परिस्थितीला दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे.

 

Loading Comments