भोईवाडा परिसरातला 'सेल्फी पॉईंट'

 BMC office building
भोईवाडा परिसरातला 'सेल्फी पॉईंट'
भोईवाडा परिसरातला 'सेल्फी पॉईंट'
भोईवाडा परिसरातला 'सेल्फी पॉईंट'
See all

परळ - भोईवाडा पोलीस लाईन इथल्या युवक एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं देखाव्यातून 'बेटी बचाओ; बेटी पढाओ'चा संदेश दिलाय. मंडळानं स्त्री भ्रूणहत्या या विषयावर देखावा साकारला आहे. तसंच मंडळानं मंडपाबाहेर छत्र्यांची आकर्षक सजावट केली आहे. या छत्र्यांवर विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणा-या महिलांची छायचित्रं लावण्यात आली आहेत. राजकारण, कला, खेळ क्षेत्रातल्या महिलांची छायाचित्र असलेला 'सेल्फी पॉईंट' मंडळाचं यंदाचं आकर्षण ठरत आहे.

गेली 30 वर्षं मंडळ सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम गणेशोत्सवादरम्यान राबवत आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर तिउरवाडे यांनी दिली. 

Loading Comments