वडाळ्यात 'माय मराठी' व्याख्यान

 wadala
वडाळ्यात 'माय मराठी' व्याख्यान

वडाळा - 'माय मराठी' या विषयावर गुरुवारी व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र ग्रंथालय यांच्या वतीने वडाळ्यातल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या चंचल स्मृती सभागृहात हे व्याख्यान पार पडलं. या वेळी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. सुषमा पौडवाल (निवृत्त ग्रंथपाल, एसएनडीटी महिला विद्यापीठ) आणि अध्यक्ष डॉ. बी. ए. सनान्से (निवृत्त ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य) यांची उपस्थिती होती. या व्याख्यानात वक्त्यांनी मराठी भाषेची पार्शवभूमी, मराठी भाषेची रचना, भाषिक अभिसरण, भाषिक संस्कार, भाषेतील वाटा आणि वळण इत्यादी मुद्दे मांडले.

Loading Comments