जीवरक्षकाला शौर्य पुरस्कार बहाल

 BEST depot
जीवरक्षकाला शौर्य पुरस्कार बहाल

कुलाबा - समुद्रात बुडत असलेल्या तरुणाला जीवदान देणाऱ्या जीवरक्षकाला शिवसेनेने शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथून मुंबईत आलेला पर्यटक देवीश कनशीतिह्या हा तरुण कड्यावरून तोल गेल्यामुळे समुद्रात पडला होता. यावेळी पिर सय्यद मोहम्मद या जीवरक्षकाने स्वतः चा जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर पोलिसांनी सत्कार करून पिर सय्यद मोहम्मदला सन्मानित केले होते. आता कुलाबा शिवसेनेनेही त्याच्या धाडसाची दखल घेत त्याला सन्मानित केले. विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते 5 हजार रुपये रोख रक्कम व पदक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलाबा शिवसेना विधानसभा समन्वय कृष्णा पावले, महिला विभग प्रमुख सुवर्णा शेवाळे, शाखाप्रमुख संतोष वीर, मयूर कोकम व कुलाबा परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Loading Comments