एक व्हॅलेंटाईन डे असाही!

 Mahalaxmi
एक व्हॅलेंटाईन डे असाही!
Mahalaxmi, Mumbai  -  

महालक्ष्मी - व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी सर्वचजण आपल्या 'समवन स्पेशल'सोबत हा दिवस साजरा करतात. पण गझल गायिका सोनाली राठोड हिने हाच दिवस जरा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. या दिवशी तिने महालक्ष्मी येथील ओम क्रिएशन संस्थेतल्या गतिमंद मुलांना भेट देऊन त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सोनालीला पाहून मुलं आनंदी आणि उत्साही झाले. या वेळी सोनालीने संस्थेतील मुलांनी तयार केलेल्या वस्तू आणि त्यांनी काढलेली चित्रे पाहिली. व्हॅलेंटाइन डे निमित्त सोनालीने या वेळी ओम क्रिएशनच्या मुलांसोबत गाणं देखील गायलं. याच सोबत केक कापून मोठ्या उत्साहात सोनालीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

Loading Comments