Advertisement

आवक वाढल्याने बकऱ्या, मेंढ्यांचा भाव पडला


आवक वाढल्याने बकऱ्या, मेंढ्यांचा भाव पडला
SHARES

देवनार : बकरी ईदनिमित्त पालिकेच्या देवनार पशूवधगृहात बकरे आणि मेंढ्यांची आवक सोमवारी अचानक वाढल्यामुळे त्यांचे भाव पडले. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी पशूवधगृहात तुडूंब गर्दी केली होती. ईदच्या पार्श्‍वभूमीवर सर्वाधिक महागड्या बकर्‍याला एक लाख 10 हजारापर्यंतचा भाव मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. 1 सप्टेंबरपासूनच या पशूवधगृहात बकरे, मेंढ्या आणि शेळ्यांची महाराष्ट्रासह परराज्यातून आवक सुरू झाली होती. दररोज 10 ते 20 हजार बकरे आणि मेंढ्यांची विक्री झाली. 1 ते 11 सप्टेंबरपर्यंत तब्बल दोन लाख 40 हजार बकरे, मेंढे, शेळ्यांची आवक झाली. त्यांच्या खरेदीसाठी प्रारंभी ग्राहकांची संख्या कमी होती. पण गणपतीच्या आगमनानंतर जनावरांची संख्या आणि खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शनिवारी तब्बल 46 हजार आणि रविवारी 25 हजार बकरे, मेंढ्या, शेळ्यांची विक्री झाली. यंदा सुमारे 10 हजार जनावरांची विक्री झाल्याची शक्यता पशूवधगृहातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वर्तवली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा