कुर्ला - रेल्वेप्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या एका सराईत आरोपीला शनिवारी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. हाफिज हनिफ (१९) असे या मोबाईल चोरणा-या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लोकल गाडयांमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक वाढले होते. गर्दीचा फायदा घेत हा आरोपी मोबाईल चोरी करत होता. कुर्ला रेल्वे पोलिसांकडे अशा प्रकारे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवली होती. दरम्यान सकाळी हा आरोपी पोलिसांना कुर्ला रेल्वे स्थानकात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला हटकले असता, त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पकडून त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या बँगेत पोलिसांना १९ मोबाईल आढळून आले.