सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी

  Pratiksha Nagar
  सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी
  मुंबई  -  

  सायन - सायन-पनवेल मार्गावर आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी झालेला अपघात आणि नंतर वाशी पुलावर बंद पडलेल्या टॅंकरमुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, दुपारी 2 वाजल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

  आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वाशी गाव परिसरात दुचाकीला डंपरने धडक दिली. त्यामुळे सायनहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्यावर काही वेळाने वाशी पुलावरही टॅंकर बंद पडला. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमुळे मानखुर्दपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.