आता फेरीवाल्यांना बसणार चाप

 Mohammed Ali Road
आता फेरीवाल्यांना बसणार चाप

मोहम्मद अली रोड - सध्या पालिकेतर्फे अनोखा उपक्रम हाती घेतला गेला आहे. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला जात आहे. ही संकल्पना आहे पालिकेच्या सिंघमची म्हणजेच बी वॉर्ड सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांची. शिरुरकर यांनी फेरीवाल्यांना चाप बसावा यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

शिरुरकर यांनी पहिल्या टप्प्यात 40 झाडे अनधिकृत असलेल्या जागी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल एका आठवड्यापासून शिरुरकर या कामात व्यस्त आहेत. त्याचबरोबर या झाडांवर पालिकेचे अधिकारी आणि सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवणार आहेत. ही झाडे तोडण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला शिक्षा आणि दंड करण्याची सोयसुद्धा शिरुरकर यांनी केली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना चाप बसणार हे मात्र नक्की. या निर्णयाचं स्थानिकांकडून स्वागत होत आहे.

Loading Comments