Advertisement

याला बसस्टॉप म्हणायचं का?


याला बसस्टॉप म्हणायचं का?
SHARES

अंधेरी वेस्ट - अंधेरी वेस्टच्या मेट्रो ब्रिजखाली बेस्ट बसेससाठी स्टॉप आहे. पण हा बेस्टसाठी स्टॉप कमी आणि फेरीवाल्यांचाच स्टॉप जास्त वाटतोय. जे. पी. रोडवरच्या या बसस्टॉपची अवस्था गंभीर झालीये. काही ठिकाणी स्टॉपवर छत नाहीये, तर काही ठिकाणी फेरीवाल्यांनी सर्रास अतिक्रमण केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून वर्सोवा, जुहू आणि विरादेसाईला जाणा-या शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक आणि इतर रहिवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. मात्र त्याविषयी ना पालिका अधिकारी पावलं उचलत, ना स्थानिक नगरसेवक. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमा होणा-या महसूलाचं नक्की होतं तरी काय असा प्रश्न स्थानिक विचारू लागलेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा