जागतिक मराठी चेंबरचा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा

Shivaji Mandir
जागतिक मराठी चेंबरचा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा
जागतिक मराठी चेंबरचा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा
See all
मुंबई  -  

दादर - जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचा 23 वा वर्धापनदिन आणि उदयोगरत्न पुरस्कार सोहळा शनिवारी दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात पार पडला. या वेळी कार्यक्रमाची सुरुवात पंडित सुरेश बापट यांच्या शास्त्रीय संगीताने झाली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिनेत्री पूर्वी भावे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित राहिले होते. मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे देखील उपस्थित होते.

जागतिक मराठी चेंबरचे कार्याध्यक्ष खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, "जागतिक मराठी परीषदेचे अधिवेशन मॉरीशसला झाले तेव्हा स्वर्गीय माधवराव गडकरी हयात होते. गडकरींच्या सोबतच्या आठवणी आजही आमच्या लक्षात आहेत. भविष्यात मराठी उद्योग भवन उभे करण्याचा जागतिक मराठी चेंबरचा मानस आहे. महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावेत हाच या माध्यमातून आमचा हेतू असणार आहे." 

या वेळी महाराष्ट्रातल्या 5 उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गद्रे मरिन एक्स्पोर्टचे संचालक दीपक गद्रे, पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर, देसाई प्रॉडक्टसचे प्रोप्रायटर अमर देसाई, मिलक्स कंट्रोल गिअर्स प्रायवेट लिमिटेडच्या संचालिका मानसी बिडकर, जे. दत्ता आणि कंपनीचे संचालक लक्ष्मण हरी जोशी यांचा समावेश होता.

Loading Comments
© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.