दादर फुलमार्केटचा ब्रिज बंदच

  Dadar
  दादर फुलमार्केटचा ब्रिज बंदच
  मुंबई  -  

  दादर - गेल्या 8 दिवसांपासून दादर फुलमार्केटमधून दादर टीटीला जाण्यासाठी वापरला जाणारा पाय-यांचा पब्लिक ब्रीज दुरुस्तीच्या कारणामुळे बंद करण्यात आला आहे. शहरातील आणि उपनगरातील अनेक प्रवासी या पूलावरुन ये-जा करत असतात. या पुलाच्या दुरुस्तीला विलंब होत असल्यामुळे नागरीक जुन्या ब्रीजचा वापर करतात. हा ब्रीज मुख्य मार्केटमध्ये आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि नागरीकदेखील या पुलाचा वापर करतात. हा मुख्य ब्रीज असल्यामुळे वेळेत दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवाच्या काळात देखील हा ब्रीज बंद होता. अजूनही याची दुरुस्ती न झाल्यामुळे लोकांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.