शाळेच्या मैदानावर गॅरेजचा खेळ

 Bandra west
शाळेच्या मैदानावर गॅरेजचा खेळ
शाळेच्या मैदानावर गॅरेजचा खेळ
शाळेच्या मैदानावर गॅरेजचा खेळ
See all
Bandra west, Mumbai  -  

वांद्रे तलावाच्या शेजारी असलेल्या नौपाडा उर्दू, हिंदी शाळेच्या आवारात असलेल्या गॅरेजमुळं विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत. मैदानाच्या आवारातच हे गॅरेज असल्यानं मुलींना खेळण्यासाठी दुस-या इमारतीच्या आवारात जावं लागतंय. 

यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वांद्रे उपाध्यक्ष पप्पू वासुदेव बबेरवाल यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडं तक्रार नोंदवली. पण सरकारी कार्यालयांनी हे प्रकरण दफ्तर दिरंगाईत लटकवलं. कुठलाही शालेय कार्यक्रम किंवा परेड असल्यावर शिक्षक आणि विद्यार्थिनींना गॅरेजसमोर उभं राहाव लागतं. त्यावेळी गॅरेजमधून येणा-या उग्र वासानं विद्यार्थिनी आणि शिक्षक त्रस्त होतात.  

Loading Comments