पोलिसांवरील हल्ले थांबेनात

  Andheri west
  पोलिसांवरील हल्ले थांबेनात
  मुंबई  -  

  दिवसेंदिवस पोलिसांवर होणारे हल्ले वाढतच चालले आहेत. विलास शिंदे यांच्यानंतर आता अजून एका पोलिसावर हल्ला झालाय.   विलेपार्ले परिसरात हेल्मेट न घातल्यानं अडवणूक करणा-या महिला ट्राफिक कॉन्स्टेबलवर एका महिलेनंच हल्ला केला आहे. आरती पाटलेकर नावाच्या महिलेनं महिला कॉन्स्टेबल प्रियांका खोत यांच्या कानशीलात लगावली. एवढेच नव्हे तर त्यांच्या पोटात लाथ मारल्याचंही पोलिसांनी म्हटले आहे.  या प्रकरणी पोलिसांनी आरती आणि तिच्या भावाला अटक केली आहे. नुकतच पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनादेखील मारहाण करण्यात आली होती. त्यात विलास शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वच स्थरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. पण आता पुन्हा अशीच घटना समोर आल्यानं पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.    

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.