Advertisement

विद्यार्थी भारतीचा अनोखा महिला दिन


विद्यार्थी भारतीचा अनोखा महिला दिन
SHARES

मुंबई - महिला दिनानिमित्त विद्यार्थी भारतीच्या वतीने मुलींच्या ड्रेसकोड संदर्भात फतवे काढणाऱ्या एसएनडीटीच्या कुलगुरूंना गुलाबाचं फुल देण्यात आलं. गांधीगिरी पद्धतीने या कुलगुरूंचा निषेध या वेळी नोंदवण्यात आला. आजच्या आधुनिक काळात मुलींबद्दल असे फतवे काढणे मानसिक आणि वैचारिक रुग्ण असल्याचं लक्षण आहे, अशी टिका विद्यापीठ अध्यक्षा चिंगारी यांनी दिली.

6 डिसेंबर 2016ला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मुलींच्या ड्रेसकोडसंदर्भात फतवा काढला होता. त्यावेळेस विद्यार्थी भारतीने आंदोलन करून त्या नियमाला जोरदार विरोध केला. त्यावेळेस झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत आम्ही या बद्दल लेखी प्रतिक्रिया कळवू असे त्यांनी म्हटले होते. पण अनेक महिने उलटूनही त्यांनी एकही पत्र किंवा लेखी, तोंडी प्रतिसाद कळवलेला नाही असं सचिन सुतार यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा